ताजे अपडेट

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे १६ डिसेंबर पासून ३ दिवस सुश्राव्य प्रवचन

Spread the love

सांगोला : श्री समर्थ सद्‌गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव श्रीराम मंदिर व ध्यानमंदिर, सांगोला येथे प्रतिवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष वद्य १ सोमवार दि. १६ डिसेंबर ते बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ असा साजरा होत आहे. श्रीराम सन्निध सद्‌गुरु आहेतच या भावनेने या परिसरात भीक्षा, भजन, मौन, गायन, कीर्तन, प्रवचन, उपासना, अखंड १३ तासाचा जप इ. कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी ६ वा. मंगलधून व काकडा श्रीराम मंदिर व ध्यान मंदिर, रोज सकाळी ६.३० वा : राममंदिर येथे सामुदाईक जप व उपासना.
३ दिवसीय प्रवचनमाला सोमवार दि. १६/१२/२०२४ ते बुधवार दि. १८/१२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ध्यान मंदिर सांगोला येथे होणार असून पंढरपूर येथील संत माणकोजी महाराज बोधले यांचे विद्यमान वंशज ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांचे  “राम म्हणता रामची होईजे”  या विषयावर ३ दिवस सुश्राव्य अशी प्रवचन माला होणार आहे. शुक्रवार दि. २०/१२/२०२४ रोजी सायं. ६ वा. सज्जनगड येथील सेवेकरी ह.भ.प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे.
शनिवार दि. २१/१२/२०२४ रोजी सायं. ६ वा. ह. भ. प. श्री. गुरुनाथ महाराज कोटणीस सांगली यांचे प्रवचन
तर रविवार दिनांक २२/१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ध्यान मंदिर सांगोला येथे श्री. दयानंद बनकर व त्यांचे सहकाऱ्यांचा भजन संध्या हा भावगीत, भक्तीगीत, अभंग, गौळणीचा बहारदार कार्यक्रम होईल.
बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत श्रीमती शुभांगी कवठेकर यांचे पुण्यतिथीचे कीर्तन व श्रीमहाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल. नंतर महाराजांची पालखी व नगर प्रदक्षिणा शोभायात्रा निघेल. दुपारी १२ वाजता आरती व १२ ते २ महाप्रसाद ध्यानमंदिर, सांगोला येथे होईल.
तरी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन नामसाधना मंडळातर्फे करण्यात आले आहे.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे १६ डिसेंबर पासून ३ दिवस सुश्राव्य प्रवचन
सांगोला : श्री समर्थ सद्‌गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा १११ वा पुण्यतिथी महोत्सव श्रीराम मंदिर व ध्यानमंदिर, सांगोला येथे प्रतिवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष वद्य १ सोमवार दि. १६ डिसेंबर ते बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४ असा साजरा होत आहे. श्रीराम सन्निध सद्‌गुरु आहेतच या भावनेने या परिसरात भीक्षा, भजन, मौन, गायन, कीर्तन, प्रवचन, उपासना, अखंड १३ तासाचा जप इ. कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी ६ वा. मंगलधून व काकडा श्रीराम मंदिर व ध्यान मंदिर, रोज सकाळी ६.३० वा : राममंदिर येथे सामुदाईक जप व उपासना.
३ दिवसीय प्रवचनमाला सोमवार दि. १६/१२/२०२४ ते बुधवार दि. १८/१२/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ध्यान मंदिर सांगोला येथे होणार असून पंढरपूर येथील संत माणकोजी महाराज बोधले यांचे विद्यमान वंशज ह.भ.प. डॉ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांचे  “राम म्हणता रामची होईजे”  या विषयावर ३ दिवस सुश्राव्य अशी प्रवचन माला होणार आहे. शुक्रवार दि. २०/१२/२०२४ रोजी सायं. ६ वा. सज्जनगड येथील सेवेकरी ह.भ.प. श्री. राघवेंद्रबुवा देशपांडे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे.
शनिवार दि. २१/१२/२०२४ रोजी सायं. ६ वा. ह. भ. प. श्री. गुरुनाथ महाराज कोटणीस सांगली यांचे प्रवचन
तर रविवार दिनांक २२/१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता ध्यान मंदिर सांगोला येथे श्री. दयानंद बनकर व त्यांचे सहकाऱ्यांचा भजन संध्या हा भावगीत, भक्तीगीत, अभंग, गौळणीचा बहारदार कार्यक्रम होईल.
बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी पहाटे ५ ते ६.३० या वेळेत श्रीमती शुभांगी कवठेकर यांचे पुण्यतिथीचे कीर्तन व श्रीमहाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल. नंतर महाराजांची पालखी व नगर प्रदक्षिणा शोभायात्रा निघेल. दुपारी १२ वाजता आरती व १२ ते २ महाप्रसाद ध्यानमंदिर, सांगोला येथे होईल.
तरी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन नामसाधना मंडळातर्फे करण्यात आले आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका