आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुनोनी काळूबाळुवाडी येथील शेकाप कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
आमदार शहाजीबापू पाटील यांना बहूमतांनी विजयी करण्याचे कार्यकर्त्यांचे आश्वासन


सांगोला : सांगोला जुनोनी काळूबाळूवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. हा शिवसेना पक्षप्रवेश सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालय सांगोला येथे करण्यात आला.
सांगोला तालुक्यातील जुनोनी- काळूबाळूवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून आमदार शहाजीबापू पाटील यांना राजकीय ताकद देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये शिवाजी ठोंबरे, संजय लोखंडे ,विजय ठोंबरे, गोरख करांडे, नाना ठोंबरे ,रामा शेळके, विकास व्हनमाने, सचिन शेळके, अजय खटके, पका कांबळे, शरद कांबळे, पिंटू ठोंबरे, मारुती लोखंडे, किसन व्हनमाने यांचा समावेश आहे. यावेळी जुनोनी काळूबाळूवाडी येथील माजी सरपंच भगवान देशमुख वस्ताद दगडू चौगुले , ग्रामपंचायत सदस्य नारायण तंडे , माजी सरपंच गुलाब होवाळ, ग्रामपंचायत सदस्य आबा पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कार्यकर्त्यांनी आपले योगदान देऊन जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत. कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी प्रसंगी सहकार्य करू .यावेळी गावातील ज्येष्ठ मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले .यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना विजयी करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करू असे आश्वासन दिले.