ताजे अपडेटमाणदेश वार्ता स्पेशल

महत्वाची बातमी:’हिट ॲण्ड रन’ कायदा 2022 अपघातग्रस्तांना मिळतात २ लाख रुपये

जखमीला ५० हजार रुपये; अज्ञात वाहनाने धडक दिल्यास मदतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करा दावा दाखल

Spread the love

 

मुंबई : अज्ञात वाहनाने धडक दिल्यावर एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्यांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. यासाठी संबंधित तपासी पोलिस अंमलदार किंवा नातेवाइकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. हिट अॅण्ड रन या कायद्यांतर्गत ही मदत केली जाते; परंतु याची सामान्यांसह पोलिसांना फारशी माहिती नसल्याने लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. याच अनुषंगाने सर्व ठाणेदारांना पत्र काढण्यात आले आहे.

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार एखाद्या व्यक्तीला, वाहनधारकाला जर अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात संबंधित वाहनधारक किंवा व्यक्ती मृत झाल्यास किंवा जखमी झाल्यास त्याच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. या कायद्याची फारशी जनजागृती नसल्याने याचा अद्याप तरी कोणी लाभ घेतलेला नाही. विशेष म्हणजे नुकसान भरपाई दावा नातेवाईक किंवा संबंधित तपासी अंमलदार, पोलिस अधिकारी, कर्मचारीही करू शकतात.

■ अनेकदा भरधाव वाहने पादचारी किंवा छोट्या वाहनाला धडक देऊन निघून जातात. त्यात संबंधिताचा मृत्यू किवा त्यांना जखम होते.अशा वेळी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला जातो; परंतु त्या वाहनाचा तपास लागत नाही.असे अनेक गुन्हे आजही तपासाविना प्रलंबित आहेत. याच अपघातात मृत, जखमी झालेल्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.पैशांत त्याची नुकसान भरपाई होत नसते; परंतु तरीही भारत सरकारने काही ना काही मदत व्हावी, यासाठी हिंट अॅण्ड रन मोटार अपघात योजना २०२२ मधून आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.या कायद्याची आणि योजनेची जिल्हाभरात जनजागृती होणे आवश्यक आहे.

■ यासाठी महसूल, पोलिस आणि विधी विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

‘हिट अॅण्ड रन मोटार अपघात योजना २०२२’चा लाभ घेण्यासाठीसंबंधित व्यक्ती जिल्हा वाहतूक शाखा, संबंधित पोलिस ठाणे किंवा आपले उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधू शकतात. त्यांच्याकडे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाची २५ फेब्रुवारी २०२२ रोजीची अधिसूचना आणि अर्जही मागू शकतात.                                          जखमीला ५० हजार रुपये : अज्ञात वाहनाने धडक दिल्यास मदतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करा दावा दाखल.

• अपघातात मृत किवा जखमी

झाल्यास ठाण्यातील पोलिस कर्मचारी किवा मृत, जखमीचे नातेवाईक हे संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दावा दाखल करू शकतात.

■ संबंधितांना १०० टक्के नुकसान भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांनीही प्रयत्न करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले आहेत.                                                                doc202222720301👈👈 केंद्र शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
कॉपी करू नका