ताजे अपडेटलोकसभा निवडणुक 2024

सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

Spread the love

 

सोलापूर  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ही विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात आणि निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्हयात (पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांची हदद वगळून) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 च्या अधिकारान्वये पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, यांनी आदेश जारी केला आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेस स्वाधिन असलेले पोलीस अंमलदार व त्यांचे वरिष्ठ अधिका-यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 मधील पोटकलम क ते च प्रमाणे दि. 16 मार्च 2024 रोजीचे 00.00 वा. पासुन ते दि. 06 जून 2024 रोजीचे 24.00 वा. पर्यंत रस्त्यावरील जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्याची वर्तणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. मिरवणूकीचा मार्ग व वेळ विहित करणे. मिरवणूकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेचे वेळी व कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक निवा-याच्या ठिकाणी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होवू न देणे.

सर्व रस्त्यावर, घाटात किंवा घाटावर, सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, जत्रा, मंदिरे व इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यस्था राखणे. सार्वजनिक ठिकाणी वादय वाजविणे गाणी गाणे, ढोल, ताशे व इतर वादय वाजविण्याचे आणि शंख व इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे. सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिका-याने हया अधिनियमाची कलमे 33,35,37 ते 40,42,43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आदी अधिकार प्रधान केले आहेत.

सदर आदेश प्रेत यात्रेस लागू नाही, सदचा आदेश संपूर्ण सोलापूर ग्रामीण जिल्ह्यासाठी (मा.पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून ) दि. 16 मार्च 2024 चे 00.00 वा. पासून ते दि. 6 जून 2024 रोजीचे 24.00 वा. पर्यंत लागू राहिल .कोणीही सदर आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे कारवाईस प्राप्त राहील. असा आदेश पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे.

 

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका