वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सांगोला येथील माळी समाजासाठी स्मृतीभवन बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर
आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक समाज घटकाला व त्यांच्या प्रश्नांना दिला न्याय

सांगोला : शहरातील माळी समाज बांधवांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना भेटून माळी समाजाकरिता नगरपालिकेच्या जागेमध्ये महात्मा फुले स्मृतीभवन( सभामंडप) उभारण्यासाठी निधीची मागणी केली होती .या मागणीची दखल घेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीच्या संदर्भात पाठवा करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सांगोला येथील माळी समाजासाठी स्मृतीभवन बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला .त्यामुळे माळी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .स्मृतिभावनासाठी निधी मिळाल्याने आमदार शहाजीबापू पाटील यांचे माळी बांधवांनी आभार व्यक्त केले.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक समाज घटकाला व त्यांच्या प्रश्नांना न्याय दिला आहे. प्रत्येक समाजासाठी भरीव निधी देऊन समाजमंदिर तसेच अनेक विकासात्मक मागण्या पूर्ण केल्या आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपालिकेच्या जागेमधे माळी समाजाच्या स्मृतीभवन बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील हे कार्यतत्पर आमदार म्हणून प्रसिद्धीस आले आहेत.