राजकारणविधानसभा निवडणुक २०२४

सांगोला विधानसभा मतदार संघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला तो आम्ही लढविणारच-डॉ. बाबासाहेब देशमुख

सांगोला मतदार संघात महाविकास आघाडी फूट?

Spread the love


सांगोला : सांगोल्याच्या जागेवरून शेतकरी कामगार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीने जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार लढतील असे जाहीर केल्यामुळे सांगोल्यात महाविकास आघाडीमध्ये फूट पडली असून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा खुलासा करत कोणत्याही परिस्थितीत सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्ष लढवेल आणि ती स्वबळावर जिंकेल सुद्धा असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीच्या राज्यातील व जिल्ह्यातील नेते मंडळींनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
आज सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी च्या देशपातळीवरील नेते मंडळींनी सांगोल्याची जागा शिवसेना उबाठा लढवेल असे जाहीर केले आहे. त्या धरतीवर शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख बोलत होते.

सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असून स्व.आबासाहेबांनी या मतदारसंघाचे ६० वर्षे प्रतिनिधित्व केले. प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी पुरोगामी विचार जपला. वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना राज्यात आणि जिल्ह्यात सहकार्य केले.त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाला सहकार्य करावे. निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व जनता ताकतीने काम करत असून सांगोला विधानसभा मतदारसंघावर बहाद्दर, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बळावर शेकापचा लालबावटा फडकावून आबासाहेबांना श्रद्धांजली वाहू असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

 

सांगोला शेतकरी कामगार पक्षाने १३ निवडणुका स्वबळावर लढविल्या आहेत पैकी ११ निवडणुकीत बहुमताने जिंकल्या आहेत तर दोन निवडणुकीत अल्पमताने पराभव झाला आहे असे असताना सांगोला मतदार संघ आमचा बालेकिल्ला आहे तो महाविकास आघाडीतील मित्र पक्षास कदापि सोडणार नाही शेतकरी कामगार पक्षाची पाळेमुळे या मतदारसंघात घट्ट रोवली आहेत आम्ही उसना उमेदवार घेऊन निवडणूक लढवत नाही या मतदारसंघात आमची ताकद आहे ही ताकद २३ तारखेला निश्चित दाखवू असा विश्वास शेकाप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका