गुन्हेगारीताजे अपडेट
Trending

सांगोला तालुक्यातील कोळा येथे दोघांचा खून

दोन खुनाच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर 

Spread the love

सांगोला : कोळा (ता. सांगोला) येथे दोन गटात चाकू धारदार शस्त्र, काठी, लाकडी फळीने केलेल्या जबर मारहाणीत दोघांचा खून झाला, तर दोन्ही गटातील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चवट्यावर आलेला आहे.अज्ञात कारणावरून सहाजणांनी संगणमत करून चाकूने पोटात भोसकून एकाचा खून केला तर एकास पोटात भोसकून गंभीर जखमी केले तर दुस-या घटनेत दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून सहाजणांनी लाकडी फळीने व हाताने लाथाबुक्क्यांनी केलेल्या हाणामारीत एकाचा खून केला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री कोळे (ता. सांगोला) येथे घडली. बाळू शामराव आलदर (रा. संत तुकाराम नगर, आलदर वस्ती कोळे ता. सांगोला) व सुरज उर्फ बंड्या रमेश मोरे (वय ३१, रा. आंबेडकर नगर, कोळे ता. सांगोला) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत, कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली असून, पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत दोघांना अटक केली असून चौघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी समवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेवून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे दोघांचे खून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर वर आला असुन जनतेत पोलिसाचा धाक राहिला नसल्यानेच असे गुन्हे होऊ लागले आहेत, अशी चर्चा तालुक्यातील नागरिकांतून केली जात आहे.

संपादक

आपल्या परिसरातील निर्भिड व सडेतोड बातम्यांसाठी 9028591431 हा मोबाईल नंबर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड करा. या संकेत स्थळावरील बातम्या व लेख यास संपादक सहमत असतील असे नाही. आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी संपर्क मो. नं.9028591431

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
कॉपी करू नका